मुंबई, ४ जानेवारी (वार्ता.) – नागपूर येथे ४ जानेवारीपासून विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष चालू करण्यात आला आहे. वर्षभरात होणार्या ३ विधीमंडळ अधिवेशनांपैकी १ अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे, असा विधीमंडळाचा करार आहे. त्यानुसार प्रतीवर्षी १ अधिवेशन नागपूर येथे होते; मात्र या अधिवेशनानंतर नागपूर येथे कोणतेही कामकाज होत नाही. केवळ अधिवेशनापुरते प्रशासकीय यंत्रणा नागपूर येथे नेण्यात येते; मात्र आता नागपूर येथे कायमस्वरूपी विधीमंडळाचे कामकाज होणार आहे. विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी अशा प्रकारचा कक्ष पुणे येथेही चालू करण्यात येईल, असे म्हटले.