डोंबिवली हे मिनी हिंदु राष्ट्र; रविंद्र चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा ! – सुनील देवधर, ज्येष्ठ नेते, भाजप

रविंद्र चव्हाण

डोंबिवली – राज्याची सांस्कृतिक नगरी म्हणजे डोंबिवली शहरात आल्यावर मिनी हिंदु राष्ट्रामध्ये आल्याचा आनंद होतो. त्यात हा जनसंघाचा बालेकिल्ला असून ती परंपरा आणि संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना १०० टक्के मतदान करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. डोंबिवलीचा गड अभेद्य रहाण्यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे दायित्व सर्वांचे आहे, असे मत भाजपचे माजी केंद्रीय चिटणीस, ज्येष्ठ नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केले. डोंबिवलीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह संघ परिवाराच्या माध्यमातून १०० टक्के मतदान जनजागृतीसाठीच्या ‘लोकमत परिष्कार’ उपक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी ते शहरात आले होते. नंतर रविंद्र चव्हाण यांच्या भाजप निवडणूक प्रचार कार्यालयात येऊन त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला.