पूर्वजांंनी राखलेल्या भूमी आमच्याच, सरकारच्या नाहीत ! – सत्तरीतील लोकांचा दावा

विश्‍वजित राणे यांनी सत्तरीतील लोकांची दिशाभूल केली. त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी व्यासपिठावर येऊन आमच्याशी चर्चा करावी, असे आव्हान या वेळी सत्तरी तालुक्यातील नागरिक आणि अधिवक्ता शिवाजी देसाई यांनी विश्‍वजित राणे यांना दिले.

आमदार केसरकर यांच्या आश्‍वासनानंतर रवि जाधव यांचे उपोषण मागे

नगरपरिषदेने काढलेला स्टॉल पुन्हा उभारून द्यावा, या मागणीसाठी गेले ७ दिवस रवि जाधव हे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करत होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना राष्ट्रपती पोलीस पदक घोषित !

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी दिगंबर सावंत यांना त्यांच्या विशेष कामगिरीविषयी राष्ट्रपती पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे. राज्यातील एकूण ४० जणांना हे पदक घोषित झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील सावंत हे एकमेव आहेत.

इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांच्या मागणीनुसार कमानवेस येथे महापालिकेच्या गाड्या लावण्यासाठी वाहतनळ 

महापालिकेने या कचरा गाड्यांसाठी कमानवेस येथे वाहनतळ उभारण्याचे काम चालू केले आहे. त्वरित काम चालू केल्याविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था आणि नागरिक यांनी आयुक्तांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणार्‍या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आदी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

वास्तविक अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून अशा आस्थापनांच्या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे !

पोलिसांच्या अनुमतीनंतर ३० जानेवारीला पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन

कोरेगाव भीमा येथील या हिंसाचाराला एल्गार परिषदेची किनार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते; मात्र आता ३ वर्षांनंतर पुन्हा एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अनुमती दिल्यामुळे आता ही परिषद होत आहे.   

ओबीसींची जातीनिहाय जनगणना हवी ! – पंकजा मुंडे, नेत्या, भाजप

धनंजय मुंडे प्रकरण संवेदनशील असल्याने त्याचे मी राजकीय भांडवल करणार नाही !

सेवामुक्त करण्यात आलेल्या परिचारिकांना पुन्हा सेवेत घेण्याच्या मागणीसाठी परिचारिकांचे निषेध आंदोलन

काही दिवसांपूर्वी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या जळीत प्रकरणाच्या संदर्भात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ७ लोकांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

१३ वर्षे संघर्ष करूनही न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करणार !

देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या वीरपत्नीस जर १३ वर्षे न्याय मिळत नसेल, तर प्रशासनासाठी हे लज्जास्पद आहे !

गोवा माईल्स या टुरिस्ट टॅक्सीसेवेविषयी मंत्री मायकल लोबो यांचेच प्रश्‍नचिन्ह !

मंत्री मायकल लोबो म्हणाले, गोवा माईल्स सेवेला दाबोळी विमानतळावर काऊंटर का देण्यात आला आहे ? ही सेवा अ‍ॅपवर आधारित असल्याने प्रवासी अ‍ॅपच्या माध्यमातून या सेवेचा काऊंटरशिवाय सहजतेने लाभ घेऊ शकतात. या सेवेमुळे पारंपरिक टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे…