पुणे – वर्ष २०१७ मधील एल्गार परिषदेनंतर दुसर्या दिवशी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ हिंसाचाराची घटना घडली होती. या हिंसाचाराला एल्गार परिषदेची किनार असल्याचे न्यायालयात सांगण्यात आले होते; मात्र आता ३ वर्षांनंतर पुन्हा एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अनुमती दिल्यामुळे आता ही परिषद ३० जानेवारी या दिवशी गणेश कला क्रीडा मंच येथे होत आहे.
निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे-पाटील यांनी गेल्या वर्षी २१ डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्याची घोषणा केली होती; मात्र परिषदेला अनुमती नाकारण्यात आली होती. कोरोना असल्यामुळे या परिषदेला २०० जणांनाच सहभाग घेण्याची अनुमती देण्यात आली आहे.