कुडाळ – तालुक्यातील देऊळवाडी, वेताळबांबर्डे येथील श्री देव लिंग मंदिर आणि श्री गणपति मंदिर या २ मंदिरांतील एकूण ३ दानपेट्या अज्ञातांनी फोडल्याचे ५ एप्रिल या दिवशी सकाळी उघड झाले. या घटनेत एकूण ३ सहस्र ५०० रुपये रोख रक्कम चोरण्यात आली. या फोडलेल्या दानपेट्या मंदिराच्या बाहेर टाकून चोर पसार झाले. प्रभाकर शंकर सामंत यांनी या घटनेविषयी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची असुरक्षित मंदिरे |