आज कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील पशूवधगृहे बंद !

प्रतिकात्मक चित्र

कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि मोठी जनावरे यांची कत्तल अन् त्यांच्या मांसाची विक्री करणार्‍या तमाम खाटीक /कसाई, तसेच अधिकृत/अनधिकृत परवानाधारक मांसविक्रेत्यांना कळवण्यात येते की, ६ एप्रिल या दिवशी असलेल्या श्रीरामनवमीच्या निमित्ताने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व लहान-मोठ्या जनावरांची पशूवधगृहे महाराष्ट्र शासन निर्णयानुसार बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची कत्तल करू नये, तसे केल्यास कारवाई केली जाईल, अशी सूचना महानगरपालिका उपायुक्तांनी दिली आहे.