
ठाणे, ५ एप्रिल (वार्ता.) – कोणत्याही अधिकृत कागदपत्रांविना भारतात प्रवेश करून उल्हासनगर येथे वास्तव्यास असलेल्या अमिना खातून हरुन गाझी उपाख्य रेक्सोना उपाख्य पूजा (वय ३४ वर्षे) या बांगलादेशी महिलेला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. मागील काही मासांपासून ही महिला येथे बेकायदेशीररित्या रहात होती. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच बांगलादेशी नागरिक भारतात घुसखोरी करण्याचे धाडस करत आहेत. – संपादक)