रंकाळा येथील विद्युत् दिवे आणि खांब यांची हानी करणार्यांवर गुन्हा नोंद करा ! – कोल्हापूर शहर सुधारणा समिती
कोल्हापूर शहराचा रंकाळा तलाव हा मानबिंदू असून याच्या सुशोभिकरणाच्या कामामुळे रंकाळ्याचे सौंदर्य खुलून दिसत आहे. अलीकडे रंकाळ्यावर विद्युत् दिवे आणि खांब यांची दुरवस्था करण्याचे प्रकार चालू झाले आहेत.