खर्‍या योग्यतेचा पुरुष महत्पदाला कसा पोचतो ?

दुसर्‍यांच्या कामांतील दोष काढत बसणे यासारखे जगात दुसरे सोपे काम नाही. सहस्रो माणसे कसलेही वेतन न घेता हे काम मन लावून करत असतात. स्वतःचे काम बिनचूक करण्यापेक्षा इतरांच्या कामाविषयी टीका करणे अनायासाचे (सोपे) आहे. कुणाला साहाय्य करण्यापेक्षा त्याला विघ्न आणणे सहज साधण्यासारखे आहे. आपले शील उत्तम बनवणे कठीण काम आहे; परंतु दुसर्‍याचा लौकिक खराब करण्यास मुळीच श्रम पडत नाहीत. दुसर्‍याची छिद्रे शोधण्यात आपला वेळ घालवणे, हे क्षुद्र मनाचे द्योतक आहे. खर्‍या योग्यतेचा पुरुष अशा गोष्टीपासून स्वतःला अलिप्त ठेवतो. त्याला आपल्या वेळेची आणि विचारांची किंमत ठाऊक असते अन् यामुळेच तो महत्पदाला चढू शकतो.

(साभार : ‘किर्लाेस्कर खबर’, गोवा, वर्ष १९२३)