मुंबईत भ्रमणभाष चोरणार्‍या दोन सराईत चोरांना अटक !

आरोपींविरोधात मुंबईसह इतर परिसरात अनेक गुन्हे नोंद आहेत. विक्रम भोसले आणि बंटी भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पिंपरी (पुणे) शहरातील विज्ञापन फलकांमुळे जीवित किंवा वित्त हानी झाल्यास फलक मालकाचे दायित्व !

येत्या काही दिवसांमध्ये वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने फलक पडून जीवित किंवा वित्त हानी झाल्यास त्यास विज्ञापन फलकधारक उत्तरदायी असेल, अशी चेतावणी महापालिकेने दिली आहे.

पुणे येथे निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित रहाणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करणार ! – डॉ. सुहास दिवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, “राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे आकाराने मोठा आहे. ४ लोकसभा मतदारसंघ आणि ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे आहेत. परिणामी निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागत आहे.

महाराष्ट्रात मतदानाच्या आवाहनासाठी निवडणूक आयोग घेणार प्रसिद्ध व्यक्तींचे साहाय्य !

प्रसिद्ध व्यक्तींच्या आधाराने नव्हे, तर लोकप्रतिनिधींचे कार्य पाहून कधी मतदान होणार ?

बुद्धीप्रामाण्यवादी आणि संत यांच्यातील भेद लक्षात घ्या !

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

या हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

म्यानमारच्या अराकान प्रांतातील बुथिदुआंग येथे १ सहस्र ६०० हून अधिक हिंदू आणि १२० बौद्ध धर्मियांना रोहिंग्या मुसलमानांच्या सशस्त्र संघटनेने ओलीस ठेवल्याचे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने प्रसारित केले आहे.

जीवघेणा खेळ !

चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !

वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’चे संस्थापक लखन जाधवगुरुजींची जाणवलेली वैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१७ एप्रिल २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘सव्यासाचि गुरुकुलम्’ची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहिली. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.