पुणे – पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेचे उल्लंघन केल्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलीस अधिकार्यांशी पबमालक आणि व्यवस्थापक यांनी वादावादी केली. त्यामुळे कल्याणीनगर परिसरातील ‘बॉलर पब’च्या मालकासह व्यवस्थापकावर येरवडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार नोंदवली. बॉलर पबमध्ये नियोजित वेळ संपूनही युवक-युवतींची गर्दी होती. ग्राहकांना खाद्यपदार्थ, मद्यपान या सेवा पुरवल्या जात होत्या. लामखेडे यांनी पब बंद करण्यास सांगितले असता पबमधील व्यवस्थापकाने पोलिसांशी वाद घालून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी पबचे मालक आणि व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.