मुंबई, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – भाऊबीजेची ओवाळणी म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी महिलांच्या रक्षणाची ग्वाही दिली आहे. ‘महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या रक्षणाची ओवाळणी-महाराष्ट्र पोलिसांकडून सिद्ध आहे’, अशा प्रकारचा संदेश महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित करण्यात आला आहे.
‘#भाऊबीज #महिला_सुरक्षा’ असे ‘हॅशटॅग’ करत आपत्कालीन स्थितीत महिलांच्या साहाय्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडून ‘८९७६००४१११’, ‘८६५७२२२७७७’, ‘०२२-४५१६१६३५’ हे क्रमांक प्रसारित करण्यात आले आहेत. या संदेशात ‘नि:शंकपणे प्रवास कर, मी आहे’, अशा शब्दांमध्ये पोलिसांकडून महिलांच्या रक्षणाची ग्वाही दिली आहे.
संपादकीय भूमिकामहिलांवरील वाढते अत्याचार आणि लव्ह जिहाद्यांना रोखून पोलिसांनी हे सिद्ध करून दाखवावे ! |