स्थिर सर्वेक्षण पथकाकडून १५ लाख ६१ सहस्र रुपये जप्त !

शिये-बावडा पडताळणी नाक्यावरील कारवाई !

कोल्हापूर – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत शिये-बावडा पडताळणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाने ३१ ऑक्टोबर या दिवशी २ सहस्र ५३३ वाहनांची पडताळणी केली. यातील एम्.एच्. ४६ बी.एम्. ४२९७ मध्ये १५ लाख ६१ सहस्र ८५७ रुपये इतकी रक्कम आढळून आली. या रकमेविषयी संबंधितांकडे कोणतेही पुरावे आढळून न आल्याने ही रक्कम साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जप्त केली. ही रक्कम कोषागार कार्यालयात सीलंबद पेटीमध्ये ठेवण्यात आली आहे. हे प्रकरण पुढील पडताळणीसाठी आयकर विभागाकडे पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी कळवले आहे.