कागल (जिल्हा कोल्हापूर) – कोगनोळी पथकर नाक्याजवळ करनूर गावात एक टेंपो आणि गोठा येथे १८ वासरे अन् ३४ रेडकू अवैधरित्या ठेवले असून ते कत्तलीसाठी नेण्यात येणार आहे, अशी माहिती ‘गोरक्षण सेवा समिती, निपाणी’चे प्रमुख श्री. सागर श्रीखंडे यांना मिळाली. यानंतर श्री. सागर श्रीखंडे यांनी कागल पोलिसांच्या साहाय्याने या गोवंशियांची सुटका केली. त्यांचे मूल्य २ लाख २८ सहस्र रुपये इतके आहे. या प्रकरणी श्री. सागर श्रीखंडे यांनी तक्रार दिली असून महंमद हसन शेख याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
या वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार होते. ही कारवाई ‘श्री विरूपाक्षलिंग समाधी मठा’चे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या वेळी प्राणलिंग स्वामीजी यांनी या वासरांना पुढील संगोपनासाठी ‘भगवान महावीर गोपालन सामाजिक सेवा संस्था कराड’ संचालित ‘ध्यान फाउंडेशन गोशाळा, घोलपवाडी’ येथे व्यवस्था करणार असल्याचे घोषित केले. या संपूर्ण कारवाईत सांगली येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांचे कारवाई करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन मिळाले.
संपादकीय भूमिका :
|