‘अन्नदान’ आणि ‘रामनाम’ यांचा उपदेश करणारे संतश्री जलारामबापा !

एका मुसलमानाचा मुलगा जमाल मरणासन्न अवस्थेत असतांना संतश्री जलारामबापा यांना नवस केल्याने तो वाचला.

सावधान, देशद्रोही आणि जिहादी कारवाया करत आहेत !

निराश झालेले, सत्ता उलथवून टाकण्याचा हेतू असलेले विरोधक नैसर्गिकरित्या वेडे झाले आहेत. राजकीय सत्ता परत मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊन काहीही करण्यास सिद्ध आहेत.

रामनाथी (गोवा ) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरात’ सहभागी झालेल्या साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यानंतर माझ्या शरिराचा जडपणा आणि डोळ्यांची जळजळ उणावली. मला रात्री शांत झोप लागली आणि सर्व शरीर हलके झाले. मनातील विचारांची गर्दी न्यून होऊन माझा नामजप आपोआप होऊ लागला.’

पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपेआजी (वय ७६ वर्षे) यांनी केलेल्या पंचतत्त्वांच्या प्रयोगाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती        

पू. आजींनी आश्रमाच्या समोरील टेकडीच्या दिशेने हात दाखवला असता ‘टेकडीच्या मागून कुणीतरी विजेरी दाखवत आहे’, असे दिसले आणि आकाशाकडे हात दाखवला असता आकाशात पांढरा उजेड दिसला.

निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांना बिंदूदाबनाविषयी शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

शिबिराला येण्याच्या आदल्या दिवशी मला डोकेदुखी, अंगदुखी आणि अस्वस्थता वाटत होती. मी शिबिराला आल्यावर निसर्गोपचारतज्ञ दीपक जोशी यांनी माझ्यावर बिंदूदाबानाचे उपचार केल्यानंतर माझे सर्व त्रास दूर झाले.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात रामनाथी आश्रमात आलेल्या साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या व्यापकत्वाविषयी आलेल्या अनुभूती

नामजपादी उपाय करतांना माझ्याकडून प्रार्थना होत होती. तेव्हा मला सूक्ष्मातून एक दृश्य दिसले, ‘संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा (गुरुदेवांचा) देह आहे. त्या देहात आम्ही सर्व जण रक्ताच्या थेंबाप्रमाणे सामावलेलो आहोत.’ 

पुणे येथील कु. सान्वी जरीपटके (वय १३ वर्षे) हिला रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

रात्री मी झोपायला गेल्यावर मला झोप लागली नाही. तेव्हा मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. काही वेळाने मला ‘माझ्या बाजूला कुणीतरी आले आहे’, असे वाटले. नंतर माझ्या मनात विचार आला, ‘माझ्यासमवेत श्रीकृष्ण आहे.’

आध्यात्मिक उपाय करतांना आवरण काढणे आणि न्यास करणे, हे स्थुलातून शक्य नसल्यास सूक्ष्मातून करा !

काही वेळा व्यक्तीला अती थकव्यामुळे किंवा हात दुखत असल्यामुळे आवरण काढणे किंवा न्यास करणे शक्य होत नाही. प्रवास करतांना, एखाद्या कार्यालयात गेल्यावर तेथे नामजप करायला थोडा वेळ मिळाल्यास अशा ठिकाणीही आवरण काढणे आणि न्यास करणे बहुधा शक्य होत नाही. अशा वेळी सूक्ष्मातून आवरण काढावे आणि न्यास करावा.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या आजारपणात नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे पाहूया.  

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना नवरात्रीच्या दिवसांत पदार्थ बनवून देण्याची इच्छा होणे आणि प्रत्यक्षात त्याच सेवेसाठी साधिकेला बोलावणे 

‘वर्ष २०२४ च्या नवरात्रीपूर्वी माझ्या मनात ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना नवरात्रीत काहीतरी खायचे पदार्थ बनवून देऊया’, असे विचार येत होते. त्यानुसार मी मानसरित्या त्यांना पुरणपोळी, गुलाबजाम, खीर, शिरा इत्यादी पदार्थ बनवून अर्पण करू लागले…