
सांगली – कुणी जर अवैध बांधकाम करत असेल किंवा अवैध कारवाया करत असतील, तर या सर्वांवर ड्रोनच्या माध्यमातून आम्ही लक्ष ठेवून आहोत. याची माहिती छायाचित्र, व्हिडिओ याच्या माध्यमातून आमच्याकडे येईल. यावर आवश्यक ती कारवाई आम्ही पोलीस, केंद्र सरकार यांच्या माध्यमातून करू. ड्रोनच्या माध्यमातून बंदरांसाठी सुरक्षाकवच देणारे आमचे पहिले सरकार आहे, असे मत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांनी व्यक्त केले. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.