पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपेआजी (वय ७६ वर्षे) यांनी केलेल्या पंचतत्त्वांच्या प्रयोगाच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती        

(पू.) सौ. शैलजा परांजपे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घेतलेल्या प्रयोगात तळहाताला थंडावा जाणवणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घेतलेल्या प्रयोगात हात वर करायला सांगितले. तेव्हा ‘माझ्या तळहाताच्या बोटांवरून कोणीतरी गार हवा सोडत आहे’, असे मला जाणवले. शीटकपाटात ठेवलेल्या वस्तू हातात घेतल्यावर जसा थंडावा जाणवतो, तसा थंडावा माझ्या तळहाताला जाणवत होता.’

– सौ. श्वेता शिवाजी सालेकर, खेड, रत्नागिरी.

सनातन संस्थेच्या ९० व्या (व्यष्टी) संत पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपेआजी (वय ७६ वर्षे) यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पंचतत्त्वांचे काही सूक्ष्माशी संबंधित प्रयोग केले. तेव्हा साधिकेला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. श्वेता शिवाजी सालेकर

१.‘पू. (सौ.) शैलेजा परांजपेआजी त्यांचे एक एक बोट भांड्यातील पाण्यात घालत होत्या. तेव्हा पाण्याचा रंग पालटत होता. पाण्याचा रंग थोडा गुलाबी झाल्यासारखा दिसला.

२. पू. (सौ.) आजी विजेच्या पंख्यावर प्रयोग करतांना ‘पंख्याची गती न्यून न्यून होत होती’, असे मला जाणवले.

३. पू. (सौ.) परांजपे आजींच्या तळहातावर विजेरीने प्रकाश सोडल्यानंतर तळहात तेल लावल्याप्रमाणे चकाकत होता.

४. विजेरीचा प्रकाश पू. आजींच्या हातावरून ‘थर्माकॉलशीट’वर अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाला.

५. मागे काळा पडदा लावलेला असतांना त्यासमोर पू. आजींनी त्यांचा हात धरला. तेव्हा त्यांच्या बोटांतून धूर निघतांना दिसला.

६. पू. आजींनी आश्रमाच्या समोरील टेकडीच्या दिशेने हात दाखवला असता ‘टेकडीच्या मागून कुणीतरी विजेरी दाखवत आहे’, असे दिसले आणि आकाशाकडे हात दाखवला असता आकाशात पांढरा उजेड दिसला.

– सौ. श्वेता शिवाजी सालेकर, खेड, रत्नागिरी.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक