‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात रामनाथी आश्रमात आलेल्या साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या व्यापकत्वाविषयी आलेल्या अनुभूती

१. आश्रमात येतांना बहिर्मुखतेचे विचार न्यून होऊन गुरुदेवांप्रती श्रद्धा वाढणे

‘पूर्वी प्रत्येक वेळी रामनाथी, गोवा येथील आश्रमात येण्यापूर्वी मी बहिर्मुखतेचे विचार अधिक करत असे. गुरुकृपेने या वेळी ‘मी आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला जात आहे’, असे मला वाटत होते. या वेळी मला ‘वस्तूंप्रती आसक्ती, तसेच जेवणाविषयी आवड-नावड’, असे काही मुळीच वाटत नव्हते. आश्रमात येण्यापूर्वी रेल्वे स्थानकावर अर्धा घंटा मला तीव्र आध्यात्मिक त्रास झाला; पण ‘गुरुदेव निभावून नेतील’, अशी पुष्कळ श्रद्धा माझ्या मनात निर्माण झाली.

२. आश्रमात आल्यावर मी आतून आनंदावस्था आणि निर्विचार अवस्था अनुभवत होते.

३. नामजपादी उपाय करतांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

नामजपादी उपाय करतांना माझ्याकडून प्रार्थना होत होती. तेव्हा मला सूक्ष्मातून एक दृश्य दिसले, ‘संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा (गुरुदेवांचा) देह आहे. त्या देहात आम्ही सर्व जण रक्ताच्या थेंबाप्रमाणे सामावलेलो आहोत.’

४. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी संपूर्ण ब्रह्मांड व्यापले असून सर्व साधक त्यांच्या देहात सामावले आहेत’, अशी अनुभूती येणे

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळात आम्ही साधक वेगवेगळ्या सेवा स्थूल रूपाने करत होतो; परंतु ‘आम्ही सर्व जण संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेल्या प.पू. गुरुदेवांच्या देहात सामावलेलो आहोत. त्यांची प्राणशक्ती आम्हाला मिळत आहे आणि त्या प्राणशक्तीच्या बळावरच आम्ही एखाद्या कठपुतळीप्रमाणे सर्व कार्य करू शकत आहोत’, अशी मला अनुभूती येत होती. या अनुभूतीमुळे माझा कृतज्ञताभाव वाढला.

५. शिकायला मिळालेले सूत्र

‘अहंचा लय झाल्यावर किती आनंद मिळतो, तसेच संतांकडून सतत आनंद प्रक्षेपित होत असतो’, हे मला शिकायला मिळाले.’

– श्रीमती अर्चना लढ्ढा, सोजत रोड, राजस्थान. (२६.८.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक