
सांगली – मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री विकास मंत्री यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी शाल-श्रीफळ देऊन श्री. नितेश राणे यांचा सत्कार केला. या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी श्री. नितेश राणे करत असलेल्या कार्याचे कौतुक करून हिंदु जागृतीचे काम अधिक जोमाने होण्यासाठी आशीर्वाद दिला. या प्रसंगी श्री. नितेश राणे यांनी ते गडकोट मोहिमेत सहभागी होणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजू पुजारी, तसेच अन्य धारकरी उपस्थित होते.