बीड – मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णु चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे या आरोपींवर आता मकोकाअंतर्गत खटला चालवला जाणार आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे अन्वेषण सध्या विशेष पोलीस पथक आणि राज्य गुन्हा अन्वेषण शाखा हे संयुक्तरित्या करत आहेत. या प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही; कारण त्यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे.
‘मकोका’ हा संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठीचा कठोर कायदा असून यातील संशयितांना जामीन लवकर मिळत नाही, तसेच हे खटले विशेष न्यायालयात चालवले जातात.