बीड – मराठा आरक्षणाचे आंदोलन तूर्त थांबले असले, तरी आत्महत्यांचे दुष्टचक्र मात्र चालूच आहे. गेल्या २४ घंट्यांत याच कारणासाठी बीड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील ४ जणांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. बीड तालुक्यातील कोळवाडी येथे अमोल नांदे (वय २५ वर्षे), कामखेडा येथे प्रेमराज जमदाडे (वय २२ वर्षे), चाकूर तालुक्यातील नांदगाव येथे तुकाराम मोरे (वय ५० वर्षे) आणि वैजापूर तालुक्यातील भग्गाव येथील कृष्णा जगताप (वय २० वर्षे), अशी मृतांची नावे आहेत. भग्गाव येथे कृष्णा जगताप या तरुणाने चिठ्ठीत ‘मराठा आरक्षण न मिळाल्याने आत्महत्या करत आहे’, असे म्हटले आहे.
संपादकीय भूमिका :समाजाचा संयम संपत चालल्याचे उदाहरण ! धर्मशिक्षण नसल्यामुळे आत्महत्येमुळे जीवनात होणारी हानी लक्षात येत नाही ! |