लाचखोरांचा भरणा असलेले प्रशासन !
धुळे – शेतभूमीच्या सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी २ सहस्र रुपयांची लाच घेतांना शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील मंडळ अधिकार्यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. या प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
१. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे शिरपूर तालुक्यातील वेरूळ येथे शेतभूमी आहे. तिची वाटणी करून नावावर करून देण्यासंबंधी अर्ज केला होता. त्यावर संबंधितांची नावे लावण्यात आली. त्यासाठी जवखेडा भागाचे मंडल अधिकारी मुकेश भावसार यांनी २ सहस्र रुपये मागितले.
२. तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भावसारला लाच घेतांना पकडले.