अजित पवार यांच्याविषयी पुस्तकात लिहिल्याने पुणे येथील कार्यक्रमाचे निमंत्रण रहित ! – मीरा बोरवणकर, माजी आय.पी.एस्. अधिकारी

मीरा बोरवणकर, माजी आय.पी.एस्. अधिकारी

पुणे – माजी आय.पी.एस्. अधिकारी मीरा बोरवणकर यांना २६ नोव्हेंबरला होणार्‍या ‘दक्खनी अदाफ फाऊंडेशन’च्या ‘पुणे लिटरेचर फेस्टिव्हल’साठी निमंत्रित करण्यात आले होते. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार्‍या या कार्यक्रमाचे निमंत्रण नंतर रहित करण्यात आले. याविषयी मीरा बोरवणकर म्हणाल्या, ‘‘अजित पवार यांच्याविषयी ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात लिहिल्याने पुणे येथील कार्यक्रमाचे निमंत्रण रहित करण्यात आले. कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यानंतर काही दिवसांनी मला दूरभाष आला, त्यात मला सांगण्यात आले की, अजित पवार यांच्याशी झालेल्या प्रकरणामुळे कार्यक्रम घेता येणार नाही. याचा मला एकदम धक्का बसला. या वेळी आपण राजकीय व्यक्तीबाबत बोललो आहोत, त्याला प्रतिसाद म्हणून असे काही घडेल याविषयी माहिती होते.’’ एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली आहे.

मीरा बोरवणकर लिखित ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकात राजकीय प्रकरणांशी निगडित अनेक विधाने आहेत. एका विधानात नीलम गोर्‍हे आणि मिलिंद नार्वेकर हे ‘दंगल कशी घडवून आणायची ?’ याविषयी चर्चा करत असल्याचे म्हटले आहे.