नवी मुंबई – दिवाळीच्या निमित्ताने नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचार्यांना ३० सहस्र रुपये, तर पनवेल महापालिकेच्या कर्मचार्यांना आयुक्तांनी २७ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले आहे. नवी मुंबई महापालिकेतील करार आणि तात्पुरत्या स्वरूपातील ४ सहस्र ५९९ कर्मचार्यांना २४ सहस्र रुपये, तर आशासेविका यांना १४ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. पनवेल महापालिकेच्या ५९५ कर्मचार्यांना २७ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान, ३१५ कंत्राटी कर्मचार्यांना ५ सहस्र रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तसेच पनवेल गावातील २७ कुष्ठरोग बांधवांना ४ सहस्र रुपये दिवाळीपूर्वी देण्यात येणार आहे.