क्रिकेट सामन्याच्यावेळी तिकिटांचा काळाबाजार करणार्यांना अटक !
१ सहस्र २०० रुपयांचे तिकिट १२ सहस्र रुपयांना विक्री करणार्या रवि देवकर आणि अजित कदम या दलालांना अटक केली. त्यांना युनूस शेख याने तिकिटे पुरवली. या तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.
१ सहस्र २०० रुपयांचे तिकिट १२ सहस्र रुपयांना विक्री करणार्या रवि देवकर आणि अजित कदम या दलालांना अटक केली. त्यांना युनूस शेख याने तिकिटे पुरवली. या तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.
तुर्भे भागात चरस विक्री करणार्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे १ किलो ३३८ ग्रॅम वजनाचे चरस आढळून आले. संजीव प्रकाश पाटील असे त्याचे नाव आहे.
बोरिवली भागातील तिघांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या दांडिया कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी बनावट पासचा वापर केला. ३०० रुपयांचा बनावट पास बनवल्याप्रकरणी या तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
भारतीय पारपत्रावर थायलंडला गेलेल्या बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. आरोपीने गोव्यात बनावट कागदपत्र सादर करून पारपत्र बनवल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
कंत्राटी भरतीचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात वर्ष २०१० मध्ये घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना शासकीय कामकाजात कंत्राटी कामगार नियुक्तीसाठी ९ खासगी आस्थापनांची निवड करण्यात आली.
बोरिवली परिसरात नवरात्रोत्सवात पूजा आटोपून परतणार्या महिलेला बोलण्यात गुंतवून दोन चोरांनी तिचे दागिने पळवले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलेला बोलण्यात गुंतवून चोरांनी हा प्रकार केला.
अधिकाधिक महसूल मिळावा, यासाठी दारूचे मूल्य राज्य सरकारकडून वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. अन्य मद्याच्या तुलनेत मूल्य अधिक असल्यामुळे दारूची विक्री अल्प होत असल्याची तक्रार बिअर विक्रेत्यांकडून सरकारकडे करण्यात आली आहे.
‘जो देश आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो विश्वाच्या संघर्षात वाचत नाही. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे भारत होय’, असे थोर देशभक्त इतिहासकार वि.का. राजवाडे यांनी लिहून ठेवले आहे.
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला १० नोव्हेंबर २०२० या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी ललित पाटील याला नाशिकचे जिल्हाप्रमुख केले होते.
पोलीस अधिकार्यांची मला उलटतपासणी घेऊ द्यावी. त्यासाठी संबंधित अधिकार्यांना पुन्हा आयोगासमोर पाचारण करावे, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी १९ ऑक्टोबर या दिवशी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सांगितले.