महसूलवाढीसाठी दारूचे मूल्य वाढण्याची शक्यता, अभ्यासासाठी समितीची स्थापना !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – अधिकाधिक महसूल मिळावा, यासाठी दारूचे मूल्य राज्य सरकारकडून वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. अन्य मद्याच्या तुलनेत मूल्य अधिक असल्यामुळे दारूची विक्री अल्प होत असल्याची तक्रार बिअर विक्रेत्यांकडून सरकारकडे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दारूच्या मूल्यामध्ये राज्य सरकारकडून वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वस्तूस्थिती पडताळण्यासाठी सरकारकडून उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली १९ ऑक्टोबर या दिवशी समिती स्थापन केली आहे. ही समिती १ मासाच्या आत सरकारकडे अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर सरकारकडून याविषयीचा निर्णय घेण्यात येणार आहे.