मुंबई – भारतीय पारपत्रावर थायलंडला गेलेल्या बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. आरोपीने गोव्यात बनावट कागदपत्र सादर करून पारपत्र बनवल्याचे चौकशीत उघड झाले आहे. जॉय बबलू चौधरी उपाख्य जिकू दास असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या भ्रमणभाषमध्ये आधारकार्डची २५ छायाचित्रे सापडली. (अशा घुसखोरांना हाकलायलाच हवे ! – संपादक)