कोल्हापूर – प्रतीवर्षाप्रमाणे यंदाही द्रोणागिरी आश्रमात हनुमान जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने झालेल्या सप्ताहात ह.भ.प. वठारकर यांचे कीर्तन, तसेच अवधूत महिला भजनी मंडळ, स्वरगंगा भजनी मंडळ, श्री. कुलदीप जाधव यांचे स्वामी समर्थ कथावाचन, सौ. वंदना कांबळे यांची भावगीते, मुंबई येथील श्री. महेश पाटील यांचा अमृतनाद, तसेच अधिवक्ता समीर तेंडुलकर यांच्या हस्ते होमहवन, पूजापाठ करण्यात आला.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने पहाटेपासून अभिषेक, प्रवचन, आरती, जप, गजर करण्यात आला. पहाटे ६.३१ वाजता भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी पालखी, तसेच गजराने सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, तसेच अन्य ठिकाणचे भाविक उपस्थित होते.