कवळे (फोंडा) – एस्.एस्. समिती प्राथमिक शाळेत झालेल्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये कु. चैतन्या चंद्रकांत राऊत हिने यश संपादन केले आहे. सनातनचे साधक श्री. चंद्रकांत राऊत यांची ती मुलगी आहे. इयत्ता २ ची विद्यार्थिनी असलेल्या कु. चैतन्या हिने शाळेतील संख्यालेखन आणि मोनोलॉग (एकपात्री भाषण) या स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक, तर धावण्याच्या क्रीडा स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शाळा सुधारणा समिती यांच्या वतीने तिचा ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्रे देऊन सत्कार करण्यात आला.
कु. चैतन्या ही मूळची नंदीहळ्ळी (बेळगाव, कर्नाटक) येथील असून सध्या ती आई-वडिलांसह गोव्यात तळावली येथे रहाते. ‘कु. चैतन्या मनमिळावू असून ती कुणालाही साहाय्य करण्यास तत्पर असते. ती देवाला नमस्कार आणि प्रार्थना करून शाळेत जाते. ती शाळेच्या पायरीलाही नमस्कार करते.
शाळेच्या सर्व स्पर्धांमध्ये आनंदाने सहभाग घेते. प्रतिदिन सायंकाळी देवाजवळ दिवा लावून श्लोक म्हणते, तसेच नामजपादी आध्यात्मिक उपायही करायला तिला आवडतात’, असे तिची आई सौ. प्रियंका राऊत यांनी सांगितले.