धर्मांधांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी शेवगाव बंद !
शेवगाव (जिल्हा नगर) – शेवगाव शहरात ११ मार्चच्या रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जातीय तेढ निर्माण करणारे लिखाण सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावरून संतप्त झालेले धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी १२ मार्च या दिवशी पोलीस ठाण्यासमोर एकत्र येऊन दोषी असलेल्या दोघा धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून शेख एजाज लाला आणि सय्यद अमानअली आसिर या धर्मांधांना अटक केली. आरोपींना अटक केल्यानंतर तणाव निवळला आहे; मात्र आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी १३ मार्च या दिवशी शेवगाव शहरात बंद पाळण्यात आला.
शेख एजाज लाला आणि सय्यद अमानअली आसिर या आरोपींनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाशी करणारे ‘स्टेटस’ व्हॉटस्अॅपवर ठेवल्याने हा वाद निर्माण झाला.
संपादकीय भूमिकाधर्मांधांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वावडे आणि औरंगजेब अन् अन्य मोगल आक्रमक यांच्याविषयी वाटणारी जवळीक धोकादायक आहे. अशांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! |