परभणी – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदान मासानिमित्त परभणी येथे व्यावसायिकांसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गोवा, कोकण आणि गुजरात राज्य संघटक श्री. मनोज खाडये यांनी ‘हलाल जिहाद-एक देशविरोधी षड्यंत्र’ याविषयी मार्गदर्शन केले.

या वेळी बोलतांना ते म्हणाले ‘‘देव, देश, धर्म, संस्कृती रक्षणाचे कार्य करत असतांना आपण हलाल जिहाद म्हणजे भारताच्या बरोबरीने एक वेगळी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे, हे समजून घेतले पाहिजे आणि अशा प्रकारच्या जिहादला संघटितरित्या विरोध केला पाहिजे. हलाल प्रमाणपत्र नावाची समांतर अर्थव्यवस्था रहित करा, अशी मागणी करण्याची वेळ आली आहे.’’
या प्रसंगी परभणीतील २०० हून अधिक व्यावसायिकांची उपस्थिती होती. सर्वांनी ‘हिंदु जनजागृती समितीचा ‘हलाल जिहाद’ ग्रंथ घेऊन जागृती करू’, असे सांगितले. या वेळी श्री. मनोज खाडये यांना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली.