पुणे येथे ‘विश्‍व श्रीराम सेने’च्‍या वतीने श्रीरामनवमीनिमित्त महापूजा !

चिंचवड (जिल्‍हा पुणे) – अंबिका भवन, साने चौक, मोरे वस्‍ती चिखली येथे श्रीरामनवमी निमित्त ‘विश्‍व श्रीराम सेने’च्‍या वतीने २२ मार्च ते ३० मार्च या कालावधीत नवदुर्गा पूजांचे, तसेच श्रीरामचरितमानस संकीर्तन, भजन, महापूजा हवन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. ३० मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्‍मोत्‍सव, दुपारी १२.३० वाजता महायज्ञ, तसेच दुपारी २ वाजता भव्‍य सांस्‍कृतिक शोभायात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे. तरी सर्व भक्‍तांनी या भव्‍य शोभायात्रेस उपस्‍थित रहावे, असे आवाहन विश्‍व श्रीराम सेनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष डॉ. लालबाबू गुप्‍ता यांनी केले आहे.