अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त सैनिकी सराव रोखा !

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची संयुक्त राष्ट्रांकडे मागणी !

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग

सेऊल (दक्षिण कोरिया ) – अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात १३ मार्चपासून चालू झालेला संयुक्त सैनिकी सराव रोखावा, अशी मागणी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली. हा सराव चालू झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी, म्हणजे १४ मार्चला किम जोंग यांनी दोन अल्प पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली. याआधी त्यांनी पाणबुडीवरून दोन क्रूज क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त सैनिकी सराव २३ मार्चपर्यंत चालणार आहे.