बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर धाडी !

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांच्या निवासस्थानी, तसेच त्यांच्या कार्यालयावर एकाच वेळी ६ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. या कारवाईत प्राप्तिकर विभागाने काही कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने कह्यात घेतली. देशपांडे यांचे ‘सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड’ नावाचे बांधकाम आस्थापन आहे. आर्थिक अपव्यवहाराच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत प्राप्तिकर विभागाच्या देहली आणि मुंबई येथील अधिकार्‍यांचे पथक सहभागी झाले होते.