गुरुमाऊली, ध्‍यास लागो या जिवा केवळ तुझ्‍या चरणांचा ।

सर्व साधकांचा आधार असलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘२३.५.२०२१ या दिवशी माझ्‍या मनाची स्‍थिती अस्‍थिर होती. त्‍या वेळी ध्‍यानमंदिरात गुरुदेवांशी आत्‍मनिवेदन करत असतांना त्‍यांनी सुचवलेली कविता त्‍यांच्‍याच चरणकमली अर्पण करते.

कु. सायली पाटील

हे गुरुमाऊली, कृपेची सावली ।
ने मज दूर या मायारूपी भवसागरातूनी ॥
ध्‍यास लागो या जिवा, केवळ तुझ्‍या चरणांचा ।
आस लागो या मना, केवळ तुझ्‍या वरदहस्‍ताचा ॥ १ ॥

चित्त हरवू दे तुझ्‍या नेत्रांमध्‍ये ।
देह रंगू दे तुझ्‍याच भजनांमध्‍ये ॥
हृदयात राहो अखंड तुझेच ध्‍यान ।
स्‍मरणात असू दे सदा तुझे रूप महान ॥ २ ॥

मन होते रे विचलित या सर्वांतूनी ।
जेव्‍हा जन्‍मोजन्‍मीच्‍या स्‍वभावदोषांचे संस्‍कार येती उफाळूनी ॥
दे मजला बळ, या सर्व स्‍वभावदोषांशी लढण्‍यास ।
तेव्‍हाच होईन मी पात्र तुझ्‍या पावन चरणांची धूळ होण्‍यास’ ॥ ३ ॥

– कु. सायली पाटील, जळगाव (२३.५.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक