गुरुदेवा, तोचि अधिकारी कृतज्ञतेचा ।

‘१६.६.२०२२ या दिवशी सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘शरणागती’ या सूत्रावरून घेतलेला एक भावप्रयोग ऐकल्‍यावर माझी पुष्‍कळ भावजागृती झाली. त्‍यानंतर मला पुढील पद्यपंक्‍ती सुचल्‍या.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

गुरुदेवा, भक्‍तीची मज ओढ लागू दे ।
तव चरणांचा ध्‍यास लागू दे ॥ १ ॥

गुरुविण नको कुणी दुजे ।
अशी माझी वृत्ती घडू दे ॥ २ ॥

कु. सायली देशपांडे

चरणप्राप्‍तीची तळमळ वाढू दे ।
मनी भाव असीम राहू दे ॥ ३ ॥

नेत्रांसी माझ्‍या केवळ तुज पाहू दे ।
ध्‍यानी माझ्‍या मूर्ती तुझी राहू दे ॥ ४ ॥

नको मायेचे हे जाळे ।
मन माझे मलाच छळे ॥ ५ ॥

मन माझे मंदिर बनावे ।
गुरुदेव नाथ (टीप १) त्‍यात विसावे ॥ ६ ॥

आहे सागर जो (टीप २) प्रीतीचा ।
तोचि अधिकारी (टीप ३) कृतज्ञतेचा’ ॥ ७ ॥

टीप १ : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

टीप २ : सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

टीप ३ : केवळ ज्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करावी, असे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

– कु. सायली रवींद्र देशपांडे (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०२२)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक