संतांचे श्रेष्ठत्व !

‘आपल्या मुलाचे पुढे कसे होणार ?’, ही काळजी त्याच्या आई-वडिलांना असते. याउलट ʻराष्ट्रातील सर्वजण आपलीच मुले आहेत’, या व्यापक भावामुळे संत नेहमी आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदुविरोधी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ (प्रार्थनास्थळे कायदा) कायदा त्वरित रहित करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये हिंदुत्वनिष्ठांची संतप्त मागणी

सनबर्न आयोजकांना प्रति चौरस मीटर ५ सहस्र ४०० रुपये भाडे द्यावे लागणार !

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचा कोमुनिदादला भूमीचे भाडे वाढवण्याचा आदेश – त्यामुळे पुढील आठवड्यात वागातोर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सनबर्न’ इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक कार्यक्रमासाठी भूमीचे नवे वाढीव दर लागू होणार !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची आत्महत्या नव्हे, तर खून !

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून करण्यात आला आहे, असा दावा कूपर रुग्णालयात सुशांत सिंह राजपूत यांचे शवविच्छेदन करणारे रूपकुमार शाह यांनी केला आहे.

दाऊदशी संबंध ठेवणार्‍या युवासेना पदाधिकार्‍याच्या विरोधात आंदोलन !

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून एका महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप करत २ दिवसांपूर्वी विधान परिषदेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी निलंबित !

सोलापूर जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६८ उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाविषयी सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता.

पुणे शहरात चालू वर्षी अमली पदार्थांच्या विक्रीत वाढ !

सांस्कृतिक वारसा असणार्‍या पुण्यासारख्या शहरात अमली पदार्थांच्या विक्रीत वाढ होणे, हे संस्कृती नष्ट होत चालल्याचे द्योतक. तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यापासून थांबवण्यासाठी अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

अब्दुल सत्तार यांच्या त्यागपत्राच्या मागणीवरून विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

नियमांना डावलून गायरानाची भूमी दिल्याप्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, ही मागणी विरोधकांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात लावून धरली.

भाजपने लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करावा !

हिंदु धर्म आणि हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

संतांना धमक्या !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यावर त्यांच्याकडून धर्माचरण करून घेतल्यास त्यांच्यातील धर्माभिमान वाढण्यास साहाय्य होईल. त्यांच्यात नैतिक संस्कार निर्माण होतील. याचा लाभ समाजाची सात्त्विकता आणि आध्यात्मिक बळ यांच्यात वाढ होऊन अन्य धर्मियांच्या आक्रमणांना तोंड देत ते परतवून लावता येईल.