अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची आत्महत्या नव्हे, तर खून !

शवविच्छेदन करणार्‍या कर्मचार्‍याचा दावा

डावीकडून सुशांत सिंह राजपूत आणि रुपकुमार शाह

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून करण्यात आला आहे, असा दावा कूपर रुग्णालयात सुशांत सिंह राजपूत यांचे शवविच्छेदन करणारे रूपकुमार शाह यांनी केला आहे. गळफास घेतलेले आणि खून झालेले यांच्या मृतदेहांत पुष्कळ भेद असतो. सुशांत यांच्या गळ्यावर असलेले व्रण हत्या केल्यासारखे दिसत होते. अंगावर मारहाणीचे व्रण दिसत होते. असे व्रण आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या अंगावर नसतात. याविषयी वरिष्ठांना सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. शवविच्छेदनाचे ध्वनीचित्रीकरण करण्याची मागणीही मान्य केली नाही, असेही शाह यांनी ‘टीव्ही ९’शी बोलतांना सांगितले.