
नागपूर – नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या निलंबनाची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत केली. सोलापूर जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६८ उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाविषयी सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.
डॉ. सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले की,
१. सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्र यांचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने संमत झाला नाही. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मागील ३ वर्षांपासून अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे; मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झाला नाही.
२. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांसाठी पदभरती, मशीनरी, तसेच अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल.
मुंबईतील पूर्व समुद्रकिनार्याचा पर्यटन केंद्र म्हणून विकास !
मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने वाहन चालवणार्या २ जणांवर गुन्हा नोंद
माहीम येथेही रेल्वेस्थानकाबाहेर चाकूने आक्रमण !
श्री कटमगाळदादा देवाकडे गार्हाणे घालून फर्मागुडी येथील प्रस्तावित ‘आयआयटी’ला काही जणांचा विरोध
रेशन माफिया कलीम कुरेशी टोळीवर ‘मकोका’
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री करणार्यांवर कारवाई होणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री