भाजपने लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करावा !

आमदार महेश लांडगे यांची मागणी

महेश लांडगे

पिंपरी – महाराष्ट्रात हिंदुत्वाचा सन्मान करणारे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हिंदु बांधवांना अपेक्षित असलेल्या गोहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी, तसेच लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. गोहत्या बंदी कायदा लागू झाला असला तरीही गोवंश संपवण्याचे षड्यंत्र सर्रास चालू आहे. दिवसेंदिवस लव्ह जिहादच्या घटना वाढत आहेत. धर्मांतर करून हिंदूंंवर अन्याय-अत्याचार होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करून कठोर भूमिका घ्यावी. हिंदु धर्म आणि हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.