बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे शीख तरुणावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास दबाव

पगडी काढून केस कापले !
४ जणांना अटक

कोकणातील ३८८ गावे पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याविषयी केंद्र सरकारला पुन्हा प्रस्ताव पाठवला ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात अंतर्भूत असलेली कोकणातील ३८८ गावे यातून वगळावीत, यासाठी आता केंद्र सरकारला विनंती केली आहे, तसेच याविषयीचा प्रस्तावही पुन्हा पाठवला आहे, असे उत्तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर दिले.

सदस्यांच्या वर्तवणुकीला कंटाळून उपसभापतींनी विधान परिषदेचे कामकाज ५ मिनिटांसाठी स्थगित केले !

सदस्यांच्या वर्तवणुकीला कंटाळून उपसभापतींनी विधान परिषदेचे कामकाज ५ मिनिटांसाठी स्थगित केले !

राज्यातील अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी ८०० संस्थांचा पुढाकार !

महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी दत्तक योजना चालू केली आहे. या अंतर्गत ९ सहस्र ७०० जणांशी महिला आणि बाल विकास विभागाकडून पत्रव्यवहार करण्यात आला. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून ८०० संस्था अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी पुढे आल्या आहेत, अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री मंगल प्रभात लाढा यांनी विधानसभेत दिली.

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांवरील खटले मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरण संघर्ष, पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना सांगितले.

महाराष्ट्रातील ३ साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान !

महाराष्ट्रातील ३ युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठित ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईत होणार ‘मराठी विश्व परिषद’ !

राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने मुंबईमध्ये ४ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत वरळी येथील नॅशनल स्पोर्ट स्टेडिअम येथे मराठी विश्व परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेत २० देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी २९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

अंगवाडीसेविकांच्या मानधनवाढीचा निर्णय मार्च २०२३ पर्यंत घेणार ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

राज्यातील १५ सहस्र अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सुख-दुःख समजून निर्णय घेणारे आहे. त्यामुळे याविषयीचा निर्णय मार्च २०२३ पर्यंत घेण्यात येईल, अशी ग्वाही महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.

बोगस डॉक्टरांवरील कारवाई बोगस असल्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची स्वीकृती !

राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी राज्य आणि तालुका स्तर, तसेच नगरपालिका अन् महानगरपालिका स्तर यांवर समित्या कार्यरत आहेत; मात्र या समित्या कार्यक्षमतेने काम करतांना दिसत नाहीत.

महाराष्ट्रात घुसखोरी करणार्‍या हत्तींना बाहेर काढणार ! – वनमंत्री

गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत हत्तींचा त्रास वाढला आहे. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आसाम आदी राज्यांतून हत्ती महाराष्ट्रात येत आहेत. गोंदियामध्ये हत्तींनी मोठ्या प्रमाणात धानशेतीची हानी केली आहे. शेतीच्या अवजारांसह हत्ती घरांचीही हानी करत आहेत.