अंगवाडीसेविकांच्या मानधनवाढीचा निर्णय मार्च २०२३ पर्यंत घेणार ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री

उजवीकडे मंगलप्रभात लोढा

नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील १५ सहस्र अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे सुख-दुःख समजून निर्णय घेणारे आहे. त्यामुळे याविषयीचा निर्णय मार्च २०२३ पर्यंत घेण्यात येईल, अशी ग्वाही महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. आमदार सुनील टिंगरे यांनी अंगणवाडीतील समस्यांविषयी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला मंत्र्यांनी वरील उत्तर दिले.