कुंकवाची उधळण करत श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन मोठ्या उत्साहात साजरे !

श्री तुळजाभवानीदेवी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत आणि कुंकवाची उधळण करत विजयादशमीच्या पहाटे श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन साजरे झाले. भिंगार (जिल्हा नगर) येथून आलेल्या मानाच्या पलंग पालखीचे तुळजाभवानी मंदिरात आगमन झाले. परंपरागत मार्गाने ही पलंग पालखी पायी चालत आली. नगर जिल्ह्यातील सहस्रो भाविक या पालखी यात्रेमध्ये सहभागी झाले होते. देवीला १०८ साड्यांचे दिंड गुंडाळण्यात आले. तुळजाभवानीदेवीची मूर्ती मुख्य सिंहासनावरून उचलून ती मानाच्या पालखीमध्ये बसवण्यात आली. त्यानंतर पालखीमधून तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात प्रदक्षिणा घालण्यात आली.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अन्य मान्यवर आणि सहस्रो भाविक भक्त तुळजाभवानी मंदिरात उपस्थित होते.