वादळामुळे कागदपत्रे बाहेर उडाली नाहीत ! – पुणे जिल्हाधिकारी कार्यालय

सामाजिक माध्यमांमध्ये कागदपत्रे उडाल्याची चलचित्रफीत

पुणे – ३० सप्टेंबर या दिवशी झालेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे पावसामुळे आणि वादळामुळे उडत असल्याची चलचित्रफीत सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे; परंतु त्या दिवशी झालेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताचे ‘पॅनल्स’ उडून इमारतीच्या परिसरात पडले. कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे उडाली नाहीत, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले. ३० सप्टेंबर या दिवशी आलेल्या वादळामध्ये वार्‍याच्या प्रचंड वेगामुळे छताचे बरेचसे पत्रे उडून इमारतीच्या परिसरात पडले. सदरचे पत्रे वादळात उडत असतांनाची चलचित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली. वादळात कार्यालयातील कागदपत्रे उडाली असल्याचा समज पसरला होता.