कोल्हापूर – जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज परिवाराचे आध्यात्मिक पायावर आधारित विविध पैलूंनी सेवाकार्य चालू आहे. महामार्गावर आधुनिक सुविधांसह कार्यरत ४० हून अधिक रुग्णवाहिका सह आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या. शेतकर्यांना कोरोना आणि महापुराच्या वेळी खतासह गुरांसाठी चारावाटप करण्यापर्यंत वेळोवेळी केलेले साहाय्य लाख मोलाचे आहे. याचे अनुकरण समाजात सर्वत्र व्हावे, असे प्रतिपादन भाजपचे नेते सत्यजित तथा नाना कदम यांनी केले. ६ ऑक्टोबरला गडमुडशिंगी येथे पाटील मैदानात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज परिवार सत्संग मेळावा, पादुकादर्शन आणि भजन कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.
सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील १५१ शेतकर्यांना विनामूल्य हातपंपाचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविकगण उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवासमिती, तसेच सर्व भक्तगणांनी १ मास विशेष परीश्रम घेतले होते.
क्षणचित्रे
१. प्रारंभी पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी भगवे झेंडे, उपरणे यांसह भव्य मिरवणूक काढली. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
२. या सोहळ्यात उत्तराधिकारी पू. कनिफनाथ महाराज यांचे मार्गदर्शन झाले.