‘हर घर भगवा’ अभियानाला पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करण्याचे आवाहन

पुणे, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – पुणे जिल्ह्यात ‘हर घर भगवा’ अभियानाला धर्मप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभाग घेऊन ‘हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करा’, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता. त्याचप्रमाणे पारंपरिक वेषभूषेत घर, दुकाने, तसेच उपाहारगृह येथे भगवा ध्वज लावणे, सामूहिक भगवा ध्वज उभारणे अशा प्रकारच्या कृतींतून अनेक हिंदुत्वनिष्ठ हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी होत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगावचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी ‘आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या घरावर भगवा ध्वज फडकवूया आणि हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यामध्ये आपणही आपला सहभाग नोंदवून जगाला हिंदु एकतेचे दर्शन घडवूया’, असे आवाहन केले.