वादळामुळे कागदपत्रे बाहेर उडाली नाहीत ! – पुणे जिल्हाधिकारी कार्यालय

पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताचे ‘पॅनल्स’ उडून इमारतीच्या परिसरात पडले. कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे उडाली नाहीत, असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले.

अध्यात्माला सेवाकार्याची जोड हे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज परिवाराचे कार्य लाख मोलाचे आणि अनुकरणीय ! – सत्यजित तथा नाना कदम, भाजप

६ ऑक्टोबरला गडमुडशिंगी येथे पाटील मैदानात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज परिवार सत्संग मेळावा, पादुकादर्शन आणि भजन कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

‘हर घर भगवा’ या मोहिमेअंतर्गत रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात भगव्या ध्वजाचे पूजन !

हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने देशभरात ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ साजरे केले जात आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ऑक्टोबरपासून ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला.

नाशिक येथे ५ वर्षांनी सप्तश्रृंग गडावर बोकडबळी !

प्रतिवर्षीप्रमाणे आश्विन नवमीस गडावर नवमीच्या दिवशी शतचंडी याग आणि होमहवन विधी चालू करण्यात आला. बोकड बळीच्या विधीनंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात बळीची आहुती देऊन दसर्‍याचा सोहळा पार पडला.

मैलापाणी थेट नदीमध्ये येत असल्याने पुणे शहराचे ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये नामांकन घसरले !

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये मुळा-मुठा नदीत येणार्‍या मैलामिश्रित पाण्यामुळे पुणे महापालिकेचे नामांकन घसरले आहे. त्यामुळे ‘जायका प्रकल्प’ जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत पुण्याला ‘पंचतारांकित’ शहराचे नामांकन मिळणार नाही आणि पहिल्या पाचमध्येही स्थान मिळवणे अवघड आहे

बनावट कागदपत्रांद्वारे महारेराची नोंदणी करणार्‍या ५२ विकासकांची नोंदणी रहित !

कागदपत्रांची छाननी न करता बांधकामाची अनुमती देणे आणि महारेरा नोंदणी करणे, ही कामे करणार्‍या अधिकार्‍यांवरही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कठोर कारवाई केली, तरच या गोष्टींना आळा बसेल !

‘नोबेल’ पुरस्काराचा हिंदुविरोधी ‘अजेंडा’ !

खोट्या बातम्या देणार्‍या जुबेर याचे नामांकन ! दुर्दैवाने भारतातही या ‘नोबेल’च्या वृत्तांना आणि तो मिळालेल्या व्यक्तींना वारेमाप प्रसिद्धी मिळते. यापुढील काळात हिंदूंना ‘नोबेल’चा पक्षपातीपणा जाणून घेऊन त्यांचा ‘हिंदुविरोधी अजेंडा’ हाणून पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतील !

सोलापूर महापालिकेच्या वतीने श्री सिद्धेश्वर तलावात ‘लाईट अँड साऊंड शो’ उपक्रम चालू !

महानगरपालिका ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या अंतर्गत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील तलावाच्या ठिकाणी ‘लाईट अँड साऊंड शो’ हा उपक्रम राबवत आहे.

पनवेलला जाणार्‍या लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत हाणामारी

महिला पोलिसावरही हात उगारला जाणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचे भयच राहिले नसल्याचे लक्षण !

विजयादशमीनिमित्त धारावी (मुंबई) येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन !

विजयादशमीनिमित्त धारावी येथील ‘ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पाेरेशन लिमिटेड’ आस्थापनामध्ये स्थानीय लोकाधिकार समिती या कर्मचारी  संघटनेच्या वतीने ४ ऑक्टोबर या दिवशी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.