सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

वाराणसी (उत्तरप्रदेश) – सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

१. उत्तरप्रदेश

हिंदु राष्ट्रासाठी हिंदूंनी हिंदु संघटनांच्या मागे उभे रहावे ! – श्री. आशिष तिवारी, राष्ट्रीय अध्यक्ष, भगवा रक्षा वाहिनी

लक्ष्मणपुरी (लखनौ) – हिंदु समाजावर होणारे आघात थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी केली नाही, तर हिंदूंचे पतन निश्चित आहे. त्यामुळे हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्या मागे उभे राहून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी झाले पाहिजे, असे मार्गदर्शन ‘भगवा रक्षा वाहिनी’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. आशिष तिवारी यांनी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. सनातन संस्थेच्या वतीने येथील श्री महाशक्ती निवास मंदिर सेवा समितीच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला १०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते. या कार्यक्रमाला उत्तरप्रदेश विधानसभेचे विशेष सचिव श्री. बृजभूषण दुबे यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वत:त परिवर्तन केले पाहिजे ! – अधिवक्ता शैलेंद्र पांडे, वाराणसी

वाराणसी – सत्याचा आग्रह स्वत:पासून प्रारंभ होतो. सवतःमध्ये पालट केल्यानंतरच आपण समाजात परिवर्तन करू शकतो. हीच दिशा पकडून आपण हिंदु राष्ट्राच्या दिशेने अग्रेसर होऊ शकतो, असे मार्गदर्शन अधिवक्ता शैलेंद्र पांडे यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. नाटी इमलीमधील भरत मिलापच्या वैश्य मंडपम्मध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

वाराणसी येथील गुरुपौणिमेत मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ

या गुरुपौणिमेत हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा ३४० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

भदोही

येथील ज्ञानपूरच्या हॉटेल रिजन्सी इस्टेटच्या सभागृहामध्ये भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. याचा १७५ जिज्ञासूंनी लाभ घेतला.

सैदपूर

येथील पक्का घाटमधील मोहनलाल बरनवाल सेवा सदनमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याचा १७५ जिज्ञासूंनी लाभ घेतला.


२. बिहार

परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्यासारखे गुरु लाभणे, हे आपले परमभाग्य ! – आचार्य अशोक मिश्र, अध्यक्ष, एशिया चॅप्टर, ‘वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशन’

पाटलीपुत्र येथील गुरुपौणिमेत मार्गदर्शन करतांना ‘वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशन’च्या ‘एशिया चॅप्टर’चे अध्यक्ष आचार्य अशोक मिश्र

पाटलीपुत्र – गुरु आपल्याला सत्याकडे घेऊन जातात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आपल्या सर्वांचे परम भाग्य आहे की, आपल्याला परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्यासारखे गुरु लाभले आहेत. गुरूंचा आदर्श मुलांच्या मनात सात्त्विकता निर्माण करतो. त्यामुळे त्यांना गुरूंचे चरित्र वाचायला दिले पाहिजे, असे प्रतिपादन ‘वर्ल्ड एस्ट्रो फेडरेशन’च्या ‘एशिया चॅप्टर’चे अध्यक्ष आचार्य अशोक मिश्र यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. येथील अनिसाबादस्थित चित्रगुप्त समाज, बिहारच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला १२० जिज्ञासू उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये ‘आखाडा परिषदे’चे महंत डॉ. देवनायक दास आणि ‘विश्व आखाडा परिषदे’चे बिहार प्रदेश संघटनमंत्री उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. संजय सिंह यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पाटलीपुत्र येथील गुरुपौणिमेत मार्गदर्शन करतांना श्री. संजय सिंह

समस्तीपूर

सनातन संस्थेच्या वतीने येथील गोला रोडस्थित खाटू श्याम मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.

मुझफ्फरपूर

येथील जवाहरलाल रोडवरील ‘भारत सेवाश्रम संघा’च्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक जिज्ञासू उपस्थित होते. याप्रसंगी भारत सेवाश्रम संघाचे स्वामी प्रभानंद महाराज यांनी सर्व साधकांना आशीर्वाद दिले.


३. झारखंड

केवळ आई आणि आध्यात्मिक गुरु, हेच आपल्याला निरपेक्ष भावाने मार्गदर्शन करतात !- शिव शंकर साबू, अध्यक्ष, श्री माहेश्वरी सभा, रांची

रांची – आपल्याला जीवनातील विविध प्रसंगांमध्ये गुरूंची आवश्यकता असते. केवळ आई आणि आध्यात्मिक गुरु हेच आपल्याला निरपेक्ष भावाने मार्गदर्शन करतात. माहेश्वरी समाजाची उत्पत्ती शिवापासून झाली आहे; परंतु आपण जन्मापासून वैष्णव उपासक आहोत, हीच आपल्या धर्माची विशेषत: आहे. माहेश्वरी सभेच्या माध्यमातून समाजाच्या विविध स्तरावर कार्य होत आहे. आज समाजात कुंटुंबभावनेचा लोप होत आहे, जो चिंतेचा विषय आहे. त्यासाठी सर्व हिंदूंनी त्यांच्या घरापासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री माहेश्वरी सभा, रांचीचे अध्यक्ष श्री. शिव शंकर साबू यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. सनातन संस्थेच्या वतीने येथील हिरजी करमशी सेवा संस्था (गुजराती शाळा) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा झाला. या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. साबू उपस्थित होते.

गुरुपौर्णिमेपासून धर्मरक्षणासाठी नियमित प्रयत्न करण्याचा संकल्प केला पाहिजे ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’

धनबाद – गुरुपौर्णिमा ही हिंदु धर्माची विशेषत: आहे. आपण या गुरुपौर्णिमेपासून धर्माच्या रक्षणासाठी नियमित प्रयत्न करण्याचा संकल्प केला पाहिजे. ‘तरुण हिंदू’ संघटना हिंदु राष्ट्रासाठी समर्पितपणे कार्यरत आहे, असे मार्गदर्शन ‘तरुण हिंदू’चे संस्थापक डॉ. नील भाधव दास यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. सनातन संस्थेच्या वतीने येथील पुराना बाजारस्थित शंभू धर्मशाळेमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

गुरूंच्या शिकवणीचे अनुसरण करावे ! – डॉ. कौशिकचंद्र मल्लिक, शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल

कतरास – महर्षि व्यास कलियुगाचे आदि गुरु आहेत. त्यांच्याकडून गुरु आणि शिष्य यांना धर्माच्या मार्गाने प्रेरणा मिळते. गुरु केले, म्हणजे केवळ त्यांनी दिलेल्या मंत्राचा जप करणे, एवढेच नाही, तर त्यांच्या कार्यामध्ये सेवा करणे आवश्यक आहे. ज्याला गुरु केले, त्याचे परीक्षण न करता त्यांच्या शिकवणीचे अनुसरण केले पाहिजे, असे मार्गदर्शन ‘शास्त्र धर्म प्रचार सभा, बंगाल’चे डॉ. कौशिकचंद्र मल्लिक यांनी केले. येथील राणी बाजार स्थित खेमका निवासमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाला सनातनचे संत पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता खेमका यांची वंदनीय उपस्थिती होती.


४. बंगाल

हिंदु राष्ट्रासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या साधनेचा अवलंब केला पाहिजे ! – अनिर्बान नियोगी, संस्थापक, ‘भारतीय साधक समाज’

कोलकाता – सध्या हिंदूंना धर्म आणि अध्यात्म यांचे शिक्षण देऊन जागृत करण्याची आवश्यकता आहे. जग ज्या प्रतिकुल परिस्थितीच्या दिशेन जात आहे, त्यात जीवंत रहाण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या साधनेचा अवलंब केला पाहिजे. त्यांनी सांगितल्यानुसार स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आदर्श नागरिक बनलो, तरच आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत योगदान देण्यास सक्षम होणार आहोत, असे मार्गदर्शन हावडा येथील ‘भारतीय साधक समाज’चे संस्थापक श्री. अनिर्बान नियोगी यांनी कोलकाता येथील सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

मुझफ्फरपूर येथे ‘भारत सेवाश्रम संघा’चे स्वामी प्रभानंद महाराज म्हणाले, ‘‘उत्सवांमध्ये महाप्रसादाची व्यवस्था असल्याने मोठ्या संख्येने लोक येतात; पण गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी शुद्ध ज्ञान मिळते, तरीही येथे पुष्कळ लोक येतात, हे फार चांगले  आहे.’’

वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे :

१. सनातन संस्थेच्या सैदपूरमधील गुरुपौर्णिमेसाठी बरनवाल समाजाचे अध्यक्ष श्री. रानू बरनवाल यांनी त्यांच्या समाजाचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. बरनवाल समाज गायत्री परिवाराशी जोडलेला आहे आणि प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेला तेथे गायत्री समाजाचा भंडारा होतो. असे असतांनाही श्री. बरनवाल यांनी त्यांचा कार्यक्रम अन्यत्र ठेवून सनातनला सभागृह उपलब्ध करून दिले.

२. सैदपूरमध्ये सत्संगातील जिज्ञासूने त्यांच्या मित्राकडून मंडपाचे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले.

३. येथील धर्मप्रेमी श्री. संयम बरनवाल प्रथमच गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या सिद्धतेसाठी १ दिवस आधी आले.

४. एक धर्मप्रेमी प्रयागराज येथून सुट्टी घेऊन गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी आले होते.

५. गुरुपौर्णिमेचा विषय ऐकल्यावर गाझीपूर येथील युवकाने त्यांच्या भागात लवकरच एक कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले.

६. भदोही येथील गुरुपौर्णिमेला ‘हॉटेल रिजन्सी’चे मालक आणि हितचिंतक श्री. राकेश कुमार गुप्ता शेवटपर्यंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी स्वत:हून कार्यक्रमाचे कौतुक केले.

७. भदोही येथील ‘जीवनदीप हॉस्पिटल’चे डॉ. अजित गुप्ता आणि ‘जीवनधारा हॉस्पिटल’चे  डॉ. आर्.के. पटेल कार्यक्रमाला संपूर्ण वेळ उपस्थित होते.

८. मुझफ्फरपूर येथे ५ धर्मप्रेमींनी गुरुपौर्णिमेच्या आयोजनात सहभाग घेतला, तसेच त्यांनी त्यांच्या संपर्कातील १० अन्य धर्मप्रेमींना दूरभाष करून कार्यक्रमाला बोलावले.

९. कार्यक्रम पाहिल्यानंतर एक जिज्ञासू म्हणाले, ‘‘पुढील वेळेपासून तुमच्या कार्यक्रमामध्ये मी महाप्रसादाची व्यवस्था करीन.’’

१०. ‘गुजराती स्कूल, रांची’चे श्री. दीपांकर चौहान यांनी त्यांच्या समाजाचे सभागृह, तर धनबाद येथे शंभू धर्मशाळेचे मालक श्री. शंभू अगरवाल यांचे पुत्र श्री. शरद अग्रवाल यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी त्यांचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

११. श्री माहेश्वरी सभेने गुरुपौर्णिमा आयोजनात सहभागी झालेल्या साधकांची विनामूल्य निवासव्यवस्था केली.

१२. रांचीमध्ये सकाळपासून दुपारी ४ वाजेपर्यंत पाऊस पडत होता, तरीही मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते.

१३. रांची येथील श्रीराम मंदिराच्या पुजार्‍याने गुरुपौर्णिमा निमंत्रण पत्रिका स्वत:जवळ ठेवून इतरांना निमंत्रण दिले.

१४. पाटलीपुत्र येथील श्री चित्रगुप्त समाज, बिहारचे सदस्य श्री. दीपक कुमार यांनी वातानुकूलित सभागृह अत्यल्प शुल्क आकारून उपलब्ध करून दिले.

१५. पाटलीपुत्र येथील ‘अंबा रेस्टॉरंट’चे मालक श्री. योगेश कुमार यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली. तसेच ‘बंगाल स्वीट्स’चे मालक श्री. शंकर दयाल आणि ‘चित्रगुप्त समाज’चे संयुक्त सचिव श्री. पुष्कर यांनी जलपानाची व्यवस्था केली.

१६. समस्तीपूरमध्ये अनेक जिज्ञासू कापडीफलक वाचून गुरुपौर्णिमेला उपस्थित राहिले.