हिंदु महासभेच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांच्या मेळाव्याचे आयोजन

 

सातारा, २४ जुलै (वार्ता.) – अखिल भारत हिंदु महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त हिंदुत्वनिष्ठांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद कुलकर्णी यांनी दिली.

आनंद कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘‘१ ऑगस्ट २०२२ या दिवशी शहरातील श्री काळाराम मंदिरासमोरील महाजनवाडा मंगल कार्यालयात सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल. या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, माजी प्रदेशाध्यक्ष अनुप केणी यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य, विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत. मेळावा झाल्यानंतर रात्री ८ वाजता हिंदु महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय स्थितीसह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.’’ तरी समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्व. अधिवक्ता गोविंद गांधी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आदरांजली सभेचे आयोजन

अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते, हिंदूसंघटक स्व. अधिवक्ता गोविंदजी गांधी यांचा २ ऑगस्ट या दिवशी प्रथम स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने दुसर्‍या दिवशी म्हणजे २ ऑगस्टला महाजनवाडा मंगल कार्यालय (मेळाव्याच्या ठिकाणीच) येथे सकाळी ११ वाजता आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या आदरांजली सभेला समस्त हिंदूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.