पाकिस्तानने काश्मीरविषयी बोलू नये, अशी अमेरिकेची इच्छा !  

अमेरिकेची इच्छा आहे की, पाकिस्तानने इस्रायला मान्यता द्यावी आणि काश्मीरविषयी काही बोलू नये.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविषयी तक्रार करूनही मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष ! – शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर

केवळ मीच नाही, तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आमदारांना लगाम घालण्याविषयी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते; पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रार शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी केली.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील खड्डे बुजवा ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

शहरातील नगर प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार घाट ते घाट चौक, नामदेव पायरी यांसह शहरातील रस्त्यांवर असणारे खड्डे बुजवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

पुरातत्व विभागाच्या आदेशाला न जुमानता शेकडो पर्यटक गडांवर मुक्कामी रहात असल्याने गडांच्या सुरक्षिततेचा प्रश्न !

देशातील महत्त्वाची स्मारके, पुरातन वास्तू, तसेच अवशेष यांचे संवर्धन करण्याचे दायित्व पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आले आहे; मात्र हे दायित्व पार पाडण्यास पुरातत्व विभाग अपयशी ठरत आहे.

संभाजीनगर येथे स्वेच्छानिवृत्त धर्मांध पोलिसाचे हिंदु पोलीस निरीक्षकांवर प्राणघातक आक्रमण !

धर्मांधांची क्रूर मानसिकता जाणा ! धर्मांध कोणत्याही क्षेत्रात असला, तरी क्रूरता सोडत नाही. तसेच धर्मांधांपासून पोलीस निरीक्षकही सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य जनतेने कुणाकडे पहायचे ?

डॉ. आंबेडकर यांच्या हस्तलिखित साहित्याच्या संवर्धनासाठी सरकार काय करत आहे ? – उच्च न्यायालय

डॉ. बाबासाहेबांच्या हस्तलिखित साहित्याचे संवर्धन करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

पुणे येथे २५ जूनला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित चित्रप्रदर्शनाचे आयोजन ! 

२५ जूनला फ्रांसुआ गोतिए यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. हे विनामूल्य प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे, अशी माहिती विंग कमांडर शशिकांत ओक (निवृत्त) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यार्थी आणि तरुण यांची अडचण लक्षात घेऊन कोरोनाविषयक खटले मागे घेण्याचा निर्णय !

कोरोना महामारीच्या काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे नोंद केलेले खटले मागे घेण्यासाठी क्षेत्रीय समित्यांना कार्यवाही करण्यासाठी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

धाराशिव येथे धर्मांध कनिष्ठ लिपिकाने महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेतांना तिचा केला विनयभंग !

कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एजाज शेख याने वरिष्ठ लिपिक देसाई यांना सांगून स्थानांतर करून देण्यासाठी १० सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर शेख याने महिला कर्मचाऱ्याकडून १० सहस्र रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली.

सातारा तहसील कार्यालयात वाहनतळ व्यवस्थेची मागणी !

वाढत्या लोकसंख्येच्या मानाने सध्याचे तहसील कार्यालय अपुरे पडत आहे. वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहनतळाची साधी व्यवस्थाही न करणारे सातारा प्रशासन अकार्यक्षम !